
निफाड ः वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि निफाड तालुका कराटे असोसिएशन निफाड यांच्या वतीने १४, १७, १९ वर्षांखालील शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धा निफाड येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलचे खेळाडू करुणा शिंदे, अवनी राजोळे, आदित्य मोरे, हृदय राऊत, शुभम बोरगुडे यांनी सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व्ही डी व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त आप्पासाहेब उगांवकर, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक सुभाष खाटेकर, क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.