
महिला गटात इरा पंडित, देवयानी सूर्यवंशी, अभिलाषा पांडे अव्वल
छत्रपती संभाजीनगर ः आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत आर्यन निर्मल, हर्षवर्धन भालेकर, गजानन भंडारे, अदनान बेग, उदयसिंग बारवाल, शिरीष यादव, मयूर खलाटे, इरा पंडित, देवयानी सूर्यवंशी व अभिलाषा पांडे यांनी आपापल्या प्रकारात चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४० महाविद्यालयांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मिलिंद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी स्वतः पोहून स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख, जलतरण स्पर्धेचे तांत्रिक समिती प्रमुख किरण शूरकांबळे, विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक हे उपस्थित होते.
बक्षीस वितरण सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ सुनील देशपांडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ दयानंद कांबळे डॉ विशाल देशपांडे, डॉ जी सूर्यकांत, डॉ किशोर शिरसाट, डॉ अब्दुल अन्सार, डॉ पूनम राठोड, मोहन वहिवाल यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
मुलांचा गट ः १०० मीटर फ्रीस्टाइल – १. आर्यन निर्मल (एम आय टी कॉलेज), २. शंकर चुंबळे (सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव), ३. हर्षवर्धन भालेकर (व्ही एस एस महाविद्यालय जालना).
२०० मीटर फ्रीस्टाइल – १. हर्षवर्धन भालेकर (व्हीएसएस महाविद्यालय जालना), २. आदित्य लांब (वाय सी एम महाविद्यालय अंबाजोगाई), ३. अंकुश गडदे (एस आर टी महाविद्यालय अंबाजोगाई).
४०० मीटर फ्रीस्टाइल – १. गजानन भंडारे (के एस के महाविद्यालय), २. हरीश सांगळे (बाबुराव उबाळे महाविद्यालय पडेगाव), ३. अदनान बेग (रामदास आठवले महाविद्यालय चौका).
१५०० मीटर फ्रीस्टाइल – १. अदनान बेग (रामदास आठवले महाविद्यालय चौका), २. मोहम्मद सोफियान (क्रीडा विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ).
२०० मीटर बॅक स्ट्रोक – १. गजानन भंडारे (के एस के महाविद्यालय बीड), २. हरीश सांगळे (बाबुराव उबाळे महाविद्यालय), ३. शंकर चुंबळे (सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव).
२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – १. उदयसिंग बारवाल (राष्ट्रीय महाविद्यालय कन्नड), २. बळीराम माळी (संत तुकाराम महाविद्यालय कन्नड), ३. ऋषिकेश गायकवाड (विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर).
२०० मीटर बटरफ्लाय – १. शिरीष यादव (सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर), २. साईराज तालीमकर (एमआयटी महाविद्यालय), ३. मोहम्मद सोफियान (क्रीडा विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ).
२०० मीटर वैयक्तिक मिडले – १. शिरीष यादव (सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय), २. बळीराम माळी (संत तुकाराम महाविद्यालय कन्नड), ३. साईराज तालीमकर (एमआयटी महाविद्यालय).
डायव्हिंग – १. मयूर खलाटे (चिस्तिया महाविद्यालय खुलताबाद).
मुलींचा गट
१०० मीटर फ्रीस्टाइल – १. इरा पंडित (सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय), २. पौर्णिमा मेश्राम (देवगिरी महाविद्यालय), ३. अभिलाषा पांडे (एमपी लॉ कॉलेज).
१०० मीटर बॅक स्ट्रोक – १. देवयानी सूर्यवंशी (एमपी कॉलेज), २. प्रांजली मतसागर (चिश्तिया महाविद्यालय खुलताबाद).
१०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – १. इरा पंडित (सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय), २. पौर्णिमा मेश्राम (देवगिरी महाविद्यालय).
१०० मीटर बटरफ्लाय – १. अभिलाषा पांडे (एम पी लॉ कॉलेज).