दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप 

  • By admin
  • September 7, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

नमसते नाशिक फाऊंडेशनचा उपक्रम 

नाशिक ः “जिथे कमी, तिथे आम्ही” या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे सप्रे वाडी, शिरसाटे, ता इगतपुरी, जि नाशिक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि भेटवस्तूंचे वाटप करून गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली.

फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय दप्तर, पेन्सिल, खोडरबर, रंगीत पेन्सिल, पाटी, शार्पनर, हायलाईटर आदी साहित्य देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार थंड पाण्याच्या बाटल्या देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया हे होते. यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर आणि दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांचे सहकार्य लाभले.
यावेळी अध्यक्ष विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेला अशा स्तुत्य उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या वतीने शाळेचे सहाय्यक शिक्षक एल एम लोहारे, सोनाली ठाकरे प्रशिक्षणार्थी, तसेच मुख्याध्यापक आर जी शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमास फुलचंद सप्रे, सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्नेहल देव यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारा आहे. एक पाऊल शिक्षणासाठी… एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठीअसे काम करून जो आनंद मिळतो तो सर्वात महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *