थांग-ता स्पर्धेत समृद्धी, अविका, मनस्वी, ओजस, आरव, समर्थला सुवर्णपदक 

  • By admin
  • September 7, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

सोहम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील थांग-ता असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेत समृद्धी गायकवाड, अविका डाकले, मनस्वी कर्डिले, ओजस आव्हाळे, आरव डाखोरे, समर्थ आव्हाळे यांनी सुवर्णपदक पटकावले.

सातारा परिसरातील सोहम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा घेण्यात आली. सुवर्णा आव्हाळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर चौल, सोहम इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण आव्हाळे, उपमुख्याध्यापक प्रवीण राऊत, प्रतापसिंह पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय थांग-ता स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात निवड झाली आहे, अशी माहिती सचिव प्रवीण आव्हाळे यांनी दिली.

या स्पर्धेत ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनचे सरचिटणीस महावीर धुळधर आणि सुनील डावकर यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे आयोजक आणि सोहम इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रवीण आव्हाळे, उपप्राचार्य प्रवीण राऊत, पांडुरंग उडान, अश्विनी बोजवारे, प्रीती वायकोस, सीमा नरवडे, भारती बाविस्कर, नीतू बागिले, उषा चपरवाल, सुमन जाधव, प्रमिला मगर, मुक्ता शेंडगे, सोहम आव्हाळे, मयुरेश आव्हाळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा नरवडे यांनी केले. प्रवीण आव्हाळे यांनी आभार मानले.

पदक विजेते खेळाडू

सुवर्णपदक विजेते : समृद्धी गायकवाड, अविका डाकले, मनस्वी कर्डिले, स्वरा आव्हाळे, सोनाक्षी दाभाडे, मयुरी डाखो, अनन्या माने, आराध्या गरकल, अबोली पठारे, ओजस आव्हाळे, आरव डाखोरे, आर्यन मगर, स्वरूप पवार, वेदांत आव्हाळे, समर्थ आव्हाळे, वेदांत आव्हाळे. संकल्प भंगाळे, आयुष कोल्हे.

रौप्यपदक विजेते : अनुष्का मगर, अल्फियाज शेख, नमिरा शेख, मृणाल मगरे, रुपाली यादव, तश्वी ठेंगणे, प्रविण्य वाघ, वैष्णवी पवार, हुसैन नदाफ, तनिष्क म्हस्के, पियुष सपकाळ, फराह शेख, राघव मनोहर, शुभम शेखावत, भावा शेखावत, प्रविण्य वाघ, रावस्नान, अ. गंधले.

कांस्यपदक : आदर्श वाघ, अदनान शेख, सत्यम राठोड, मयंक गायकवाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *