
नागपूर ः लखनौ येथे १६ ते १९ सप्टेंबर आणि २३ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या दोन बहु-दिवसीय सामन्यांसाठी विदर्भाच्या हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांचा १५ सदस्यीय भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू पश्चिम विभागाविरुद्ध सुरू असलेल्या दुलीप करंडक उपांत्य सामन्यात सहभागी होणाऱ्या मध्य विभागीय संघाचा भाग आहेत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने बैठक घेऊन पुढील भारत ‘अ’ संघाची घोषणा केली. या संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), देवदत्त पडिकल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दुसऱ्या मल्टी-डे सामन्यासाठी केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना संघात समाविष्ट केले जाईल आणि पहिल्या मल्टी-डे सामन्यानंतर ते संघातील दोन खेळाडूंची जागा घेतील.