
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय आंतर शालेय वुशू स्पर्धेत अनुष्का जैन, आयुषी घेवारे, प्रज्ञा वडोदे, हिंदवी कचकुरे, अद्वैत पारपल्ली, मुजम्मिल पटेल यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वूशू असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या तांत्रिक सहकार्याने उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा आहारतज्ञ डॉ जागृती गरुड, डॉ राजलक्ष्मी भाजीभाकरे, शरीरविज्ञान शास्त्र तज्ञ सौम्याज्योती डे, महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख संजीव बालय्या, जिल्हा वूशू संघटनेचे सचिव महेश इंदापुरे, क्रीडा अधिकारी खंडू यादवराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्याकरता राष्ट्रीय पंच बंटी राठोड, मुख्य प्रशिक्षक सुमित खरात तसेच पंच सय्यद सद्दाम, जहूर अली, कृष्णा चव्हाण, ओम निर्मल, आदित्य घुसळे, संतोष नवाथे, गोपाल टोम्पे, आकाश जाधव, आम्रपाली अमराव, अजिंक्य नितनवरे, अजिंक्य गायकवाड, निखिल पुसे, शुभांगी आडे, सुरेश जाधव, सचिन घायाळ, अजय चव्हाण, सपना जाधव व नजीम पटेल इत्यादींनी पंच म्हणून काम पाहिले.
सुवर्णपदक विजेते खेळाडू
१७ वयोगट ः अनुष्का दत्तात्रय जैन, आयुषी शिवकुमार घेवारे, प्रज्ञा संजय वडोदे, श्रावणी प्रशांत भोसले, शर्वरी रामेश्वर राठोड, सेजल संजय तायडे, हिंदवी अमोल कचकुरे.
१७ वयोगट मुले ः गौरव पाखरे, मानस मुठ्ठे, मुजम्मिल पटेल, सिद्धेश्वर राठोड, मोहम्मद गफार, श्रवण पवार, अद्वैत पारपल्ली, अथर्व जयस्वाल, राम आवरगावकर.
१९ वयोगट मुली ः सुकन्या आगळे, सरस्वती रोंगे, सुहानी दौंडे, संस्कृती पाटील, जुनेरा फातिमा, आकांक्षा कदम, फाल्गुनी काकडे.
१९ वयोगट मुले ः रोहित भद्रे, प्रणव मनगटे, शेख सलमान, शेख रिजवान, शेख मुनीम, मोहम्मद रकीम, योगीराज बनकर, अक्षय विश्वकर्मा, रोनक जयस्वाल, पवन सोनवणे.