
पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन घोरपडे यांना अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या स्व प्राचार्य एस एम कुलकर्णी’ आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
रोख रुपये २५ हजार, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ प्रभाकर देसाई यांच्या हस्ते सारडा महाविद्यालयात होणार आहे.
डॉ घोरपडे यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड संदीप कदम, खजिनदार अॅड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव ए एम जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शुभांगी औटी, डॉ प्रशांत मुळे, प्रा अनिल जगताप, प्रा जयश्री अकोलकर यांनी अभिनंदन केले.