
जालना ः शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे एस महाविद्यालय येथे फ्रीडम कप धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ओपन गटात वयोगट दहा ते वरिष्ठ गट तसेच पालक वर्गाने देखील उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयाचे माजी खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. ही स्पर्धा इंडियन राऊंड व रिकर्व राऊंड या दोन्ही गटात मुले मुलींची घेण्यात आली. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ हेमंत वर्मा व डॉ राजेंद्र सोनवणे आणि जिमखाना समितीचे डॉ किशोर बिरकायलू, राहुल सारस्वत, विलास बोधले, साक्षी जऱ्हाड, भवानी कोतुल्लू, द्विज वर्मा, देवकरण जऱ्हाड, आकांक्षा घाडगे, युवराज बोधले, अभिजीत वैष्णव, वैभव जीवरक, शॉन शिंदे, आणि दर्शन करांगळे यांनी परिश्रम घेतले.