
चांदूर बाजार : निर्मिती पब्लिक स्कूल येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात आणि भव्यतेत संपन्न झाली. विविध वयोगटातील संघांनी उत्तम खेळकौशल्य सादर करत स्पर्धेला रंगत आणली. ही स्पर्धा बाल मुकुंद राठी विद्यालयाने तीन गटात विजेतेपद पटकावत गाजवली.
या स्पर्धेत बाल मुकुंद राठी विद्यालयाने सर्व वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत तीन विजेतेपद पटकावली. या स्पर्धेत बालमुकुंद राठी विद्यालय संघाने १४ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांचा गटात देखील विजेतेपद संपादन केले.
या सर्व विजेत्या संघांनी आता जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्रता मिळवत शाळेचा, तालुक्याचा व परिसराचा मान उंचावला आहे. खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक सुरडकर, पर्यवेक्षक नवलकर व क्रीडा शिक्षक नवीन दंडाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या परिश्रमासह खेळाडूंची मेहनत व जिद्द या यशामागे महत्त्वाची ठरली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निर्मिती स्कूलचे मुख्याध्यापक तुषार खोंड, तालुका संयोजक पंकज उईके, डॉ तुषार देशमुख, क्रीडा पत्रकार सुयोग गोरले, शैलेश गावंडे, सर्वेश चौधरी तसेच शिक्षक, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजेत्यांचे कौतुक केले.