
नंदुरबार ः नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे क्रीडा शिक्षक डॉ जितेंद्र माळी यांचा यशवंत विद्यालय नंदुरबार येथे सत्कार करण्यात आला.
क्रीडा शिक्षक डॉ माळी यांनी “महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरुष हॉकी खेळाडूंच्या प्रेरणा आणि चिंता प्रोफाइलवरील अभ्यास” या विषयावर संशोधन करून स्वामी विवेकानंद विद्यापीठ, सागर (मध्यप्रदेश) येथून डॉक्टरेट संपादन केली आहे.
यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा राजेंद्र साळुंखे, तलवारबाजी संघटनेचे सचिव भागूराव जाधव, कोषाध्यक्ष डॉ मयूर ठाकरे, सदस्य हरीश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्र धुमाळ, क्रीडा शिक्षक मनीष सनेर व आर्चरी संघटनेचे सचिव राजेश्वर चौधरी, भटू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रातील खेळाडू, पंच, क्रीडा संघटक तसेच विविध क्रीडा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
डॉ जितेंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम जागृत ठेवत जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांचे संशोधनकार्य व शैक्षणिक प्राविण्य जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. सत्कार कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.