राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत सोलापूर संघाचा दबदबा

  • By admin
  • September 8, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

चार सुवर्णपदक जिंकून स्पर्धा गाजवली

सोलापूर ः नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने चार गटात सुवर्णपदक मिळवत स्पर्धा गाजवली.

या स्पर्धेत सब ज्युनिअर मुले व मुलींच्या गटात सोलापूर संघाने विजेतेपद पटकावले. तसेच ज्युनियर मुली टीम इव्हेंटमध्ये विजेतेपद, रेगु इव्हेंटमध्ये अजिंक्यपद अशी चार सुवर्णपदके मिळवणारा सोलापूर जिल्हा हा एकमेव ठरला आहे. नागपूर, नाशिक, नांदेड , परभणी, अमरावती, वर्धा या संघांना पराभूत करून महाराष्ट्रात दमदार कामगिरी केली.

सोलापूर संघाचे नेतृत्व सब ज्युनिअर गटात समरजित कदम, भक्ती नागणे तसेच ज्युनिअर गटात संकेत बिले, भक्ती घुले यांनी केले. मुख्य प्रशिक्षक रामचंद्र दत्तू सहाय्यक प्रशिक्षक अण्णा वाकडे तसेच संघ व्यवस्थापक यादव व हेगडे, येड्राव यांनी संघाला मार्गदर्शन केले.

या घवघवीत यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष प्राचार्य पांढरे, शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष सुजित बापू कदम, डॉ सुभाषराव कदम, उपप्राचार्य तेजस्विनी कदम, सचिव व प्रियदर्शनी कदम इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रवींद्र काशीद, भगत, डी एन जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *