
पुणे ः कोकणस्थ परिवार, पुणेचे वतीने श्रीमती अलका अरविंद दरिपकर यांचा क्रीडा व सामाजिक योगदानाबद्दल खास सत्कार सोनिया नेवरेकर यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता केळसकर होत्या. रिमा गुढेकर यांनी स्वागत केले. प्रज्ञा भोसले यांनी प्रास्ताविक केले, दीपाली विलणकर यांनी आभार मानले, संपदा वाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अलका दरिपकर यांनी संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी रायगड, ठाणे आदी ठिकाणी क्रीडा, सामाजिक व अंधांसाठी बहुमुल्य योगदान दिले आहे.