
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीचा विद्यार्थी वैभव साजिथ याने चेन्नई येथे झालेल्या पहिल्या श्री संपत मेमोरियल इंटर स्कूल चेस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत वैभवने सहापैकी सहा गुणांची कमाई करत विजेतेपद पटकावले. बुद्धिबळाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात वैभवचे हे पहिलेच विजेतेपद आहे. अकादमीला वैभवचा अभिमान आहे आणि त्याच्या भविष्यातील स्पर्धांमध्ये त्याला खूप यश मिळो अशी शुभेच्छा.