
कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर ः कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे इंडियन टीचर्स फोरमच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील उत्कृष्ट शिक्षक आणि प्रशिक्षक महेंद्र रंगारी यांना सोमवारी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध निशुल्क नाविन्यपूर्ण उपक्रमातून भरीव योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्डने सन्मानित करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्रज्ञ डॉ डी श्रीकांत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास सिनेअभिनेते संजय मोहिते, विचारवंत जॉर्ज क्रुज, दिग्दर्शक अनिल म्हमाने, नॅशनल टीचर अवार्ड विजेते सागर बगाडे, डॉ शोभा चाळके, मोहन मिणचेकर, ॲड करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर,अर्हंत मिणचेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच डी जी राजहंस, डॉ वसंत भागवत यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. महेंद्र रंगारी यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून येऊन अतिशय कष्टातून व परिश्रमातून स्वतः पीएच डी पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहेत. निःस्वार्थ भावाने त्यांची कार्य करण्याची शैली आहे. तसेच ते उत्कृष्ट शिक्षक व प्रशिक्षक असल्याची प्रचिती येते म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा अवार्ड त्यांना देण्यात येतो असे इंडियन टीचर्स फोरमने सांगितले.