
कन्नड (प्रवीण शिंदे) ः कन्नड तालुका क्रीडा समिती व महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिशोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजनाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच सरला डहाके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आमदार संजनाताई जाधव यांनी यावेळी शालेय जीवनात खेळाचे महत्व विषद केले. खेळाकडे शाळेने आणि क्रीडा विभागाने सुद्धा विविध क्रीडा प्रकाराकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. मी स्वतः खेळातील कौशल्य वापरून राजकारणात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत तालुक्यातील एकूण ८५ संघानी सहभाग नोंदवला आहे. या उद्घाटन समारंभासाठी तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य प्रवीण शिंदे, तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोसावी, क्रीडा मार्गदर्शक अविनाश काळे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, संस्थेचे अध्यक्ष के आर नवले, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम मोकासे, माजी सरपंच पी एम डहाके, माजी उपसरपंच एन ए जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोकासे, पंच कडूबा चव्हाण, रविकुमार सोनकांबळे, प्रशांत नवले, राज्यस्तरीय थ्रो बॉल प्रशिक्षक विशाल दांडेकर, एजाज शहा, राष्ट्रीय कुस्ती पंच विजयसिंह बारवाल, वासिम शेख, राहुल दनके, करण राठोड, क्रीडा शिक्षक, शाळेचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, कर्मचारी उपस्थित होते.