
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेचे आयोजन सोमवारी विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतून विभागीय शालेय स्केटिंग स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्केटिंग असोशिएशनचे सचिव अजय भटकर, तज्ज्ञ रेफ्री भिकन अंबे, संजय वखरे, शेख रफिक, किरण प्रधान, अनिल सुरडकर, देवा कांबळे, प्रसाद कुलकर्णी, सोनिया भटकर यांनी जबाबदारी पार पाडली असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.