
ठाणे ः आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू सतीश बळीराम पाटील यांना कोल्हापूर येथे मेजर ध्यानचंद महाराष्ट्र राज्य क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू महाराज सांस्कृतिक भवन, दसरा चौक या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. या प्रसंगी माजी मंत्री डॉ लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते सतीश पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी हिंद केसरी दीनानाथ सिंह, पुरस्कार समितीचे अध्यक्ष सुरेंद्र कालिरमण, धनंजय पाटील, रवींद्र पाटील बाणगेकर, अक्षता ढेकळे पाटील, अमोल साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू सतीश पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन क्रीडा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास आर जे ठाकूर, प्राचार्य नरेंद्र मोरे, विशाल कदम, कुबेर पाटील, गुरुनाथ लाड आदी मित्रपरिवार उपस्थित होते.