
राज्य मैदानी स्पर्धेतील कामगिरी ः भक्तीसह पूजा राठोडची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर ः राज्य मैदानी स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात नेहरूनगर शासकीय मैदानावरील विराट अकादमीच्या भक्ती थोरात हिने लांब उडीमध्ये ४.५ मीटर उडी टाकून अव्वल स्थान पटकाविले. भक्तीसह पूजा राठोड हिची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.
पुणे येथे झालेल्या स्पर्धेत पूजा २० वर्षांखालील गटात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय आली. या कामगिरीवर पूजाची राष्ट्रीय संघात निवड झाली. २० वर्षांखालील गटात चार बाय १०० मीटरमध्ये ओम वरवडकर हा द्वितीय आला. सचिन मायनाळे चार हा बाय १०० मीटरमध्ये द्वितीय आला.
सर्व खेळाडूंना विराट अकादमीचे सूर्याजी व भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंचा अजितकुमार संगवे, अमित पाटील, माजी तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, न्यू जॉगर्स फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संतोष कदम, यशवंत पाथरूट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.