
सोलापूर ः अखिल भारतीय रेल्वेच्या ९०व्या ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये मध्य रेल्वेच्या इतिहासात प्रथमच पुरुष संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.
यात सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या अरुण धनसिंग राठोड याने रौप्य पदक पटकावले. कोलकात्याच्या सॉल्ट लेक एसएआय ग्राउंडवर झालेल्या या स्पर्धेत अरुणने ४२ किमी मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान मिळविले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अरुणचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, प्राचार्या डॉ कलाश्री देशपांडे, प्रा नागनाथ पुदे, प्रा विजय तरंगे, सुनील राठोड व अनिल राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.