
जळगाव ः जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय हॉकी मनपा स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूल आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल या संघांनी दुहेरी मुकुट संपादन केला.
जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे मनपास्तरीय आंतर शालेय हॉकी स्पर्धा १४, १७, १९ वयोगटातील मुले आणि मुलींचे सामने संपन्न झाले. या स्पर्धेला हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस जळगावतर्फे विजेते, उपविजेते खेळाडूंना मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
विजेत्या संघांना हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा अनिता कोल्हे, जळगावचे सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष निवेदिता ताठे, सहसचिव हिमाली बोरोले, इम्रान बिस्मिल्ला, मुजफ्फर शेख, ममता प्रजापत, क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, सह क्रीडाशिक्षक आदींची उपस्थिती होती.
अंतिम निकाल
१४ वयोगट मुले ः १. अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव, २. विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.
१७ वयोगट मुले ः १. विद्या इंग्लिश स्कूल, २. अँग्लो उर्दू हायस्कूल, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.
१९ वयोगट मुले ः १. अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेज जळगाव.
मनपा हॉकी स्पर्धा निकाल
१४ वयोगट मुली ः १. विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.
१७ वयोगट मुली ः १. विद्या इंग्लिश स्कूल, २. गोदावरी सीबीएससी स्कूल जळगाव, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.
१९ वयोगट मुली ः १. डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव.