चेन्नई येथे राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचे चमकदार यश       

  • By admin
  • September 9, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

 मुंबई ः चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या वाको इंडिया कॅडेट व चिल्ड्रन राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी बजावली.

 या मेगा इव्हेंटमध्ये देशातील तब्बल २८ राज्यांमधून १३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरच्या खेळाडूंनी लक्षणीय यश संपादन केले.

मुंबईतील ग्रीशम पटवर्धन (आयईएसव्हीएन सुळे गुरुजी विद्यालय, इयत्ता ८ वी) आणि राजीव राजेश (उदयाचल प्रायमरी स्कूल, इयत्ता ४ थी) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे, शिधत गुप्ता (डॉन बास्को हायस्कूल) यानेही या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. 

या तिन्ही खेळाडूंच्या यशामागे प्रशिक्षक उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर यांचे परिश्रम, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील या कामगिरीमुळे मुंबई शहरातील किकबॉक्सिंग क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *