मुंबई ः टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ नवी मुंबई वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र टेनिकॉईट स्पर्धेकरिता पुरुष व महिला गटाच्या निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड चाचणी मधून निवड झालेला संघ हा १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम परिसर (इनडोअर हॉल) येथे आयोजित वरिष्ठ गट टेनिक्वाईट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नवी मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
जिल्हास्तरीय निवड चाचणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. ही निवड चाचणी क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोपर खैरणे, नवी मुंबई या ठिकाणी बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आधार ओळख पत्र, खेळाडूचे रेजिस्ट्रेशन कार्ड (संघटनेने दिलेले), खेळावयाचा संपूर्ण गणवेश या गोष्टी सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा सचिव वैभव शिंदे (९६९९८७७७९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.