छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इस्रो पिल्लई आउटरीच नेटवर्क संस्थेतर्फे “सॅटेलाइट मॉडेल मेकिंग स्पर्धा व सेमिनार” आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रियंका सहा आणि त्यांच्या तीन सदस्याच्या टीमने मुलांचा उत्साह वाढवत क्रिएटिव्ह अशी अॅक्टिव्हिटी घेतली.
या कार्यक्रमात दहा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला मॉडेल बनवण्यासाठी २ किट साहित्य देण्यात आले. ते किट वापरून प्रत्येक १० विद्यार्थ्यांच्या १७ गटांनी प्रत्येकी २ मॉडेल्स बनवले. एकूण १७ गट करण्यात आले आणि यामध्ये १७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्वतःच्या कल्पना शक्तीचा अविष्कार अनुभवला. मुलांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध प्रकारचे सॅटॅलाइटसचे मॉडेल्स बनवले. स्पर्धेदरम्यान “थिंक आऊट ऑफ द बॉक्स” या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सदरील उपक्रम विभागातर्फे घेण्यात आल्याबद्दल संगणक शास्त्र विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचेही कौतुक केले. उपप्राचार्य प्रा ए आर काटे, जेईई सेलचे संचालक प्रा एन जी गायकवाड यांच्या प्रेरणेने, संगणक शास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या विभागप्रमुख डॉ वंदना जाधव पाटील व त्यांची टीम यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ के बी माळी, डॉ किरण पतंगे, डॉ सीमा चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख, संगणक शास्त्र विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रा गोरे, प्रा जाधव, प्रा कणकदंडे, प्रा सोनटके, प्रा राजपूत, प्रा भगत, प्रा झिंजुर्डे या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शेवटी विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विभागातर्फे अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम पुढेही राबवण्यात्त येतील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे आयोजन पूर्णपणे संगणक शास्त्र विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचे मार्फत करण्यात आले होते.