राज्य पिकलबॉल स्पर्धेत उत्कर्ष मिश्राला विजेतेपद

  • By admin
  • September 10, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

मिश्र दुहेरीत गजेंद्र सिंग चौहान व पंक्ती छेडा यांना विजेतेपद

पुणे ः ॲमेच्युअर पिकलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एपीएएम) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय पिकलबॉल संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुसाळकर फाउंडेशन पुरस्कृत चौथ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेत ३५ वर्षावरील पुरुष एकेरीत उत्कर्ष मिश्रा याने तर, मिश्र दुहेरीत गजेंद्र सिंग चौहान व पंक्ती छेडा यांनी विजेतेपद संपादन केले.

हिंजवडी येथील द पिकल कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत ३५ वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत उत्कर्ष मिश्रा याने मंदार पुंडेचा ११-०६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत उत्कर्ष मिश्राने आनंद मंडलचा ११-०९ असा तर, मंदार पुंडेने साई पारकरचा ११-०५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

३५ वर्षांवरील मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत गजेंद्र सिंग चौहान व पंक्ती छेडा या जोडीने अतुल के व शितल लांबा यांचा १५-०७ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुसाळकर फाउंडेशनचे रोहन पुसाळकर आणि स्पर्धा संचालक चेतन सनील यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *