
छत्रपती संभाजीनगर ः रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय रिले स्केटिंग निवड चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक सचिव भिकन अंबे यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती सांगताना संयोजक भिकन अंबे म्हणाले की, शिर्डी येथे ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ४५वी ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय रिले स्केटिंग स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाईल. ही स्पर्धा रिले १, रिले २ आणि स्पीड रेस अशा तीन प्रकारांत घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२०३३१९, ९१६८४३०००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक सचिव भिकन अंबे यांनी केली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मेडल्स, सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र, आकर्षक पारितोषिक, विशेष पुरस्कार अशी विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.