
नवी दिल्ली ः भारताची स्टार महिला खेळाडू पीव्ही सिंधूची वाटचाल हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत संपुष्टात आली. हाँगकाँग ओपनमध्ये भारतीय महिला संघाचा राउंड ऑफ ३२ मध्ये पहिला सामना डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसनविरुद्ध होता आणि त्यात सिंधूला तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव सिंधूसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
पी व्ही सिंधूने डेन्मार्कची खेळाडू लाइन क्रिस्टोफरसनविरुद्ध महिला एकेरीच्या सामन्यात खूप चांगली सुरुवात केली. तिने पहिला सेट २१-१५ च्या फरकाने जिंकण्यात यश मिळवले. त्यानंतर, दुसऱ्या सेटमध्ये, डॅनिश खेळाडूने उत्तम पुनरागमन केले आणि सिंधूला १६-२१ च्या फरकाने पराभूत केले आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. या सामन्याच्या तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कठीण स्पर्धा दिसून आली आणि सिंधूचा क्रिस्टोफरसनकडून १९-२१ च्या फरकाने पराभव झाला आणि ती हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. यापूर्वी, दोन्ही खेळाडूंमध्ये एकूण तीन सामने खेळले गेले होते आणि त्यामध्ये पीव्ही सिंधू तिन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरली होती.
लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांची आगेकूच
पी व्ही सिंधू व्यतिरिक्त, लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय आणि किरण जॉर्ज हे भारताकडून हाँगकाँग ओपनमध्ये सहभागी होत आहेत, ज्यामध्ये या तिघांनीही ३२ व्या फेरीत चमकदार कामगिरी केली आणि पुढील फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. याशिवाय, दुहेरीत, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळवून अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले आहे.