
केज (जि. बीड) ः स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे सचिव गदळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्षा शैलजा इंगळे व प्रमुख अतिथी म्हणून रेखा यादव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद गुंड यांनी केले. प्रमुख अतिथींचे स्वागत विनोद गुंड, तांदळे व स्वरांजली यांनी केले.
या कार्यक्रमाला गदळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक वर्षा मॅडम, गिरी, साजेद पठाण, बोबडे, राऊत, कांदे, गोसावी, नेहरकर, पोटभरे आदी उपस्थित होते. त्यांचा सत्कार विनोद गुंड यांनी केला. या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.