
नव्या बॅडमिंटन कोर्टवर १७ सप्टेंबर रोजी रंगणार पहिली स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्कतर्फे आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे उभारण्यात आलेल्या नवीन आधुनिक बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे.

एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे संचालक संकर्षण जोशी व गोपाल पांडे यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा प्रथमच एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे होत आहे. अलीकडेच लोकार्पण झालेल्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा होणार असल्याने युवा बॅडमिंटन खेळाडूंमध्ये याविषयी उत्सुकता दिसून येत आहे. ही स्पर्धा अंडर ९ मुले-मुली, अंडर ११ मुले-मुली, अंडर १३ मुले-मुली, अंडर १५ मुले-मुली अशा विविध वयोगटात होणार आहे. साहजिकच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठीची चुरस बॅडमिंटन चाहत्यांना पहावयास मिळणार आहे असे संकर्षण जोशी व गोपाल पांडे यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी ४०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले आहे. हे शुल्क प्रती इव्हेंटसाठी असेल. या स्पर्धेत युवा बॅडमिंटन खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी हिमांशु गोडबोले (९६७३८५६५६७), सदानंद महाजन (९०२१०७८१२७) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक, ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहे अशी माहिती संचालक संकर्षण जोशी व गोपाल पांडे यांनी दिली.