सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या तांत्रिक समिती सचिवपदी शिवशंकर राठोड

  • By admin
  • September 11, 2025
  • 0
  • 32 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर येथील राष्ट्रीय खो-खो पंच शिवशंकर राठोड यांची सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या तांत्रिक समिती सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सचिव उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. राठोड यांनी यापूर्वी असोसिएशनचे विशेष निमंत्रित सदस्य व तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय खो-खो स्पर्धांमध्ये पंच म्हणून कार्य केले आहे. राठोड हे जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर बाळे येथे विज्ञान शिक्षक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल शाळेेचे मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे व शिवाजी वडते यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *