
सोलापूर ःसोलापूर जिल्हा परिषद परिषद, सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलचा अभिषेक जानगवळी याने घवघवीत यश संपादन केले. या कामगिरीमुळे त्याची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास क्रीडा शिक्षक प्रकाश कंपली यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, प्राचार्य संगीता कोळी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.