सोलापूर येथे रनिंग, फिटनेस व डाएट अवेअरनेस कॅम्प १८ सप्टेंबरला

  • By admin
  • September 11, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

सोलापूर ः चॅलेंजर स्पोर्ट्स फाऊंडेशन व गंगामाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रनिंग, फिटनेस व डाएट अवेअरनेस कॅम्प १८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा कॅम्प १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत येथील गंगामाई हॉस्पिटल येथे होणार केले आहे. या कॅम्पमध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशन, फिटनेस, रनिंग व हेल्थविषयक मार्गदर्शन केले जाणार असून, सहभागींसाठी तज्ज्ञांचे अनुभव व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. हे मार्गदर्शन अनिरुद्ध अथणी हे करणार आहेत. या कॅम्पचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह व पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे. कॅम्पमध्ये फक्त १०० सहभागींसाठी प्रवेश आहे. इच्छुकांनी नोंदणीसाठी 9175828203 अथवा 7350513197 या नंबरवर व्हाट्स ॲप मेसेज करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *