
क्रीडा प्रबोधिनी संघ उपविजेता
लातर ः पुनीत बालन गृप प्रस्तूत ५२व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद यवतमाळ संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांच्या कमाईसह पटकावले. शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने तीन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवून उपविजेतेपद संपादन केले. कोल्हापूर जिल्हा दोन सुवर्ण पदकांसह तृतीय क्रमांकावर राहिला.
स्पर्धेचे बक्षिस वितरण युवा उद्योजक आणि माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. गोजमगुंडे म्हणाले की, लातूरच्या मातीमध्ये कला आणि क्रीडा प्रकार लवकर रुजतात आणि हा नवा खेळही लातूरकर नक्कीच आत्मसात करतील. याची चुणूक सलामीलाच एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवून भविष्यातील नवे आव्हान उभे करत असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी व्यासपीठावर राज्य संघटनेचे अध्यक्ष आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे पणतू शैलेश टिळक महासचिव दत्ता आफळे, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, उपाध्यक्ष डॉ गणेश शेटकर, सुरेश समेळ, मुकूंद डांगे, तिलक थापा, दिनेश बागूल यांसह लातूरचे युवा उद्योजक सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ अशोक वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक लातूर ज्युदोचे अध्यक्ष डॉ प्रदीप देशमुख यांनी केले. राज्य तांत्रिक समितीच्या अध्यक्षा दर्शना लाखाणी, सचिव योगेश धाडवे, अतुल बामनोदकर, सचिन देवळे, निखिल सुवर्णा, स्पर्धा संचालक योगेश शिंदे आणि स्पर्धा निरीक्षक सुधीर कोंडे यांसह लातूर ज्युदो संघटनेचे सचिव आशिष क्षीरसागर, डॉ संपत साळुंके, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
१३ ते १५ वयोगटातील मुले आणि मुलींच्या स्पर्धेत २७ जिल्ह्यातील ३३४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. जॉर्डन येथे आयोजित झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले अमरावती येथील प्रशिक्षक सुशील गायकवाड यांचा संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
स्पर्धेचा अंतिम निकाल
सब-ज्युनियर मुली
२८ किलोखालील गट ः १. पौर्णिमा सातपुते, यवतमाळ, २. कनक कोल्हे, वर्धा, ३. प्रीती यादव, मुंबई आणि साई मुळीक, कोल्हापूर.
३२ किलोखालील गट ः १. रितिका खैरनार, धुळे, २. सोनल जाधव, कोल्हापूर, ३. सई साप्ते, धाराशिव व स्वरा घोडेस्वार, नागपूर.
३६ किलोखालील गट ः १. रजवी तळोकार, यवतमाळ, २. बनी दुर्गापाल, पीडीजेए, ३. पल्लवी वाघारे, नाशिक व तन्वी कणके, वर्धा.
४० किलोखालील गट ः १. शौर्या धाडवे, पीडीजेए, २. भाग्यश्री राठोड, यवतमाळ, ३. चैतन्य अंबिलदूके, नागपूर व संचिता गायकवाड, छत्रपती संभाजीनगर.
४४ किलोखालील गट ः १. किरण जाधव, क्रीडा प्रबोधिनी, २. अंजली चव्हाण, यवतमाळ, ३. ऋचा बोगा, अहिल्यानगर व तनया पाटील, सांगली.
४८ किलोखालील गट ः १. धनश्री गरकल, नाशिक, २. जेनिशा बरामु, मुंबई, ३. आनंदी शिंदे, धाराशिव व सिद्धी रनवडे, पीडीजेए.
५२ किलोखालील गट ः १. ईश्वरी क्षीरसागर, नाशिक, २. विशाखा खंदारे, यवतमाळ, ३. आलिया सिंगल, पीडीजेए व वैष्णवी जागडा, मुंबई.
५७ किलोखालील गट ः १. शिवकन्या शिंदे, क्रीडा प्रबोधिनी, २. त्रिवेणी काळे, छत्रपती संभाजीनगर, ३. अनन्या सोनकुसरे, वर्धा व दृष्टी पांगारकर, पीडीजेए.
५७ किलोवरील गट ः १. गीतिका जाधव, कोल्हापूर, २. जिज्ञासा मालोदे, नाशिक, ३. आद्या प्रकाश, रायगड व आर्या सावंत, मुंबई.