
राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या मुलींची आगेकूच
सोलापूर ः सोलापूरच्या मुलांनी दोन विजय मिळवित १३ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर संघाने नाशिकला ३०-२२ असे नमविले. मध्यंतराच्या १८-२० अशा दोन गुणांच्या पिछाडीवरून सोलापूरच्या गर्ग देशपांडे (१० गुण) व रवी बिराजदार (६) यांच्या बहारदार खेळीमुळे सोलापूरने बाजी मारली. गुरुवारी सकाळच्या सत्रात हमीज जमादार (१२ गुण) व आरहन शेख (६) यांच्या बहारदार खेळीमुळे सोलापूरने नांदेडवर ३५-२० असा दुसरा शानदार विजय मिळविला. मध्यंतरास १८-१६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिणारी ठरली.
बुधवारी मुले व मुलींच्या गटात सलामी दिलेल्या पुण्याच्या मुलींच्या संघाने गुरुवारी धाराशिव संघाचा ४०-२ असा धुव्वा उडवित दुसरा विजय नोंदविला. यात आरुषी आपटे १०, राजनंदिनी पवार ४ यांनी संघाचा विजय सुकर केला.