
उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच महापालिकेत थेट नियुक्ती करण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. महापालिका आयुक्त व प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रीडा संघटनेच्या बैठकीत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांना थेट नियुक्ती देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
महापालिका उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते सागर मगरे यांना शिक्षण विभागात नियुक्त करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. या नियुक्तीचे छत्रपती संभाजीनगर क्रीडा विश्वाने जोरदार स्वागत केले आहे. सागर मगरे यांच्या रुपाने पहिल्यांदा महापालिकेत क्रीडा प्रशिक्षकाची थेट नियुक्ती करण्यात आली आहे. ही फक्त सुरुवात आहे आगामी काळात अनेक क्रीडापटू महापालिकेत जॉइन होतील असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.