
पुणे ः ऍटॉस कंपनीच्या माध्यमातून श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली पुणे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. बोरचटे यांनी प्रास्ताविक केले. पाटील यांनी संगणक कक्षाची माहिती सादर केली.
या प्रसंगी प्राचार्य सानप यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्याना आजच्या काळात आधुनिक पद्धतीच्या ज्ञानाची अवश्यकता कंपनीच्या मदतीने पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा घेता येईल याचे महत्व सांगितले. कंपनीचे फ्रेडरिक ऑब्रिएर अटोस ग्रुपचे मुख्य माहिती अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. रमेश रामचंद्रन, दिलीप नाईकवाडी, विनोद आहुजा, नागेश चव्हाण, हरजीतसिंग बारडा, श्रीनिवास बास्सा, सुकुमार आनंदन, सुदर्शन चेल्लप्पा, प्रसाद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगणक कक्षाच्या निर्मितीसाठी विशेष सहकार्य सुशील शिंगाडे, केशव कुलथे यांचे झाले. घरबुडे, क्षीरसागर, अत्रे, वारघडे, खराडे यांनी कार्यक्रम नियोजनात योगदान दिले. बुरुड यांनी सूत्रसंचलन केले .