
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि राज्य पात्रता परीक्षा या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि त्यामुळे उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधी खुल्या झाल्या आहेत.
महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना सीएआयआर-यूजीसी, नेट, सेट, गेट, जेएएम या सारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. जेणेकरून ते पुढील शिक्षणासाठी आणि वैज्ञानिक संशोधनासाठी तयार होतील.
सीएसआयआर नेट परीक्षा ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा आहे. सेट परीक्षा ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा आहे.
ज्ञानेश्वरी पंडित, रवींद्र अधुडे, दत्ताराम सावंत, सोनाली इंगळे आणि जगदीश वावरे, आशिष घोलप, हर्षद घोळवे, ज्ञानेश्वरी पंडित, दत्ताराम सावंत, सोनाली इंगळे हे विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये रसायनशास्त्र विभागातील ६० पेक्षा जास्त विद्यार्थी विविध परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, विभागप्रमुख डॉ रजिता इंगळे आणि रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.