
नवी मुंबई ः टेनिक्वाईट असोसिएशन ऑफ नवी मुंबईतर्फे आयोजित निवड चाचणीच्या माध्यमातून महिला खेळाडूंची निवड करण्यात आली. या चाचणीत चमकदार खेळ सादर करत खेळाडूंनी संघात स्थान मिळवले.
निवड प्रक्रियेनंतर तयार झालेला महिला संघ आता नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी नांदेड येथे दाखल झाला आहे. हा संघ प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवी मुंबईच्या कन्या राज्यस्तरावर आपली छाप सोडतील आणि पदकासह परततील, अशी आम्हाला खात्री आहे,” असे मत जिल्हा संघटनेचे सचिव वैभव शिंदे यांनी व्यक्त केले.