
जळगाव ः शालेय फुटबॉल स्पर्धेत २५ वर्षानंतर मिल्लत हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सैफ शेख हा ठरला.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर शालेय मनपा व उर्वरित फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज फुटबॉल मैदानावर करण्यात आले होते. १७ वर्षांखालील मनपास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात मिल्लत हायस्कूल संघाने तब्बल २५ वर्षांनंतर विजेतेपद मिळवले. एल एच पाटील संघ उपविजेता ठरला तर तृतीय स्थानावर ओरियन सीबीएससी संघाला समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिल्लत हायस्कूलचा गोलकीपर सैफ शेख याला देण्यात आला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ अनिता कोल्हे, हुफ्फाझ फाउंडेशनचे अध्यक्ष हाफिज रहीम पटेल, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले व ममता प्रजापत तसेच राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वसीम रियाज, तौसिफ शेख, राहील अहमद, वसीम चांद, पंकज तिवारी, उदय फालक यांच्या हस्ते करण्यात आले.