
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक अशी पाच पदकांची कमाई केली.
डेरवण येथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून पदक विजेत्यांची कोल्हापूर येथे होणाऱया विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेसाठी गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, आध्या कवितके, केशर शेर, अर्णव मुरकुटे या खेळाडूंची निवड झाली आहे.
हे सर्व खेळाडू साळवी येथे छत्रपती नगर वाचनालय येथे आराध्य प्रशांत मकवाना यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, गणेश जगताप, शाळेतील सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश करार, सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, मयुरेश नडगिरी, नेव्ही ऑफिसर अदिती शिवगण, अनिकेत पवार, साहिल शिवगण, क्लबचे अध्यक्ष वकील पूजा प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी सचिन मयेकर, सचिव रंजना मोंडूला, स्नेहा मोरे, परेश मोंडूला, शलाका जावकर यांनी विजेत्या खेळांडूचे अभिनंदन केले आहे.