
निफाड ः मथुरा येथे होत असलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निफाडच्या क्रीडा सह्याद्रीचा वेदांत पडोळ याची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये क्रीडा सह्याद्री क्लबचा खेळाडू वेदांत सचिन पडोळ याने सहभाग नोंदवला होता. त्याची मथुरा येथे होत असलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी व सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी व विलास गायकवाड इत्यादी उपस्थित होते. वेदांत पडोळ हा क्रीडा सह्याद्री क्लबमध्ये पाच वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. क्रीडा प्रशिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.