
छत्रपती संभाजीनगर ः तामिळनाडू राज्यातील पोलाईची येथे नुकत्याच झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना केंब्रिज स्कूलच्या तसेच हारदे’ज् टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या आमिका शेट्टी हिने राज्यस्तरीय स्पर्धेप्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेत देखील आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत रौप्य पदकाची कमाई केली.
आमिका शेट्टी हिने देशात दुसरी येण्याचा मान पटकाविला. १४ वर्षाखालील गटात खेळताना आमिका शेट्टीला निलेश हारदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आमिकाच्या या यशाबद्दल अध्यक्ष अंकुशराव कदम, गोकुळ तांदळे, आदित्य जोशी, निलेश हारदे, गौरव भदाने आदींनी अभिनंदन केले आहे.