
मुंबई ः एमआयजी क्रिकेट क्लबच्यावतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना क्लबच्या वतीने एकूण १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर असून सायंकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजाराणी चौक जवळ, शिवाजी पार्क मुंबई येथे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.