
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत गत चार वर्षांपासून देवगिरी महाविद्यालयाचा मुलाचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यंदाही देवगिरी महाविद्यालय संघाने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेमध्ये देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांनी अंतिम सामन्यांमध्ये मौलाना आझाद संघावर सहज विजय मिळवत सलग चौथ्या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली. या शानदार कामगिरीमुळे देवगिरी कॉलेजचा संघ विभागीय स्पर्धेत पात्र ठरला आहे.
गत चार वर्षापासून या संघाला प्रशिक्षक अमोल पगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
विजेत्या संघात कबीर वाकेकर (कर्णधार), प्रेम भारसाकळे, अभिजीत डिडोरे, स्वराज इंगळे, अर्पित तिवारी, गोपीचंद राठोड, सौरभ धांडे, धीरज राठोड, सानिध्य खैरे, उमेश पाटील, अक्षय पागोरे, सुजल राठोड, आदित्य रोकडे, सागर जांगिड, समाधान शरणागत, अमन पठाण या खेळाडूंचा समावेश आहे.
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशिक्षक अनिल मोरे, संकेत नंदेश्वर, अभिषेक गुंजाळ, शिंदे व अमोल पगारे यांनी मेहनत घेतली आहे.