
दुबई ः आशिया कप स्पर्धेत रविवारी भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. या सामन्याची जगभरात मोठी उत्सुकता दिसून येत आहे. या सामन्यात आठ भारतीय खेळाडूंनी प्रथमच पाकिस्तान संघाविरुद्ध टी २० सामना खेळणार आहेत हे विशेष.
आशिया कपसाठी संघात एकूण १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ८ खेळाडू असे आहेत जे अद्याप पाकिस्तानविरुद्ध टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. त्यामध्ये शुभमन गिल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांची नावे आहेत. तर पाकिस्तानविरुद्ध टी २० सामने खेळलेले ७ भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांची नावे आहेत.
आता पाकिस्तान संघाविरुद्धचा सामना दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. या ठिकाणी टीम इंडियाने यूएई विरुद्ध जोरदार विजय नोंदवला. भारतीय संघाने दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी पाकिस्तानने दोन जिंकले आहेत आणि भारतीय संघाने एक जिंकण्यात यश मिळवले आहे.