
जळगाव ः जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धत ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ संघाने विजेतेपद पटकावले तर श्री गणेशा स्कूल जामनेर संघाने उपविजेतेपद मिळवले.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ संघाने विजेतेपद तर उपविजेतेपद लॉर्ड गणेशा स्कूल जामनेर संघाने पटकाविले. तृतीय स्थान सेंट मेरी स्कूल अमळनेर संघाने संपादन केले.
पारितोषिक वितरण समारंभ
विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना सुवर्ण व रौप्य पदक स्पोर्ट्स हाऊस जळगावतर्फे देण्यात आले. आरको रोडवेजचे संचालक रफिक पटणी, राष्ट्रीय खेळाडू तथा वेद इव्हेंट च्या संचालिका सरिता खाचणे, बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक अनिता कोल्हे व संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुरेश तरकुडे, संघटनेचे हिमाली बोरोले, ममता प्रजापत, वसीम रियाज, तौसिफ शेख, साबीर शेख, पंकज तिवारी, राहील अहमद, वसीम चांद, उदय फालक, अर्जुन सणस, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.