
यवतमाळ ः स्थानिक नेहरू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत येथील जवाहरलाल दर्डा जुनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील संघाने चांगली कामगिरी करीत गुलाम नबी आझाद हायस्कूल पुसद संघाला ३-० ने पराभूत करीत विभागीय स्तरावर दिमाखदार प्रवेश केला.
जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सहा संघानी सहभाग नोंदविला. विजयी संघात अथर्व मोहन सराटे, नयन नरेश मेश्राम, देवाशिष अनिल वांद्रे, भूषण प्रमोद लोणकर, कृष्णा गिरीधर शिंदे, युग सुरेश श्रीवास, हर्ष विवेक पांडे, नैतिक निलेश मजेठिया, रमण सुभेंदू सामंता, सुप्रित सजल सामंता, विराज सूरज बिलवाल, आदर्श पंकज शिरभाते, रेहान निसार खान, आयुष उल्हास बनसोड, पुष्कर सतीश चौधरी, जीत विजय डुमरे, युवराज योगेश मुत्तलवार, प्रेम पंकज डोल्से या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूनां क्रीडा शिक्षक करण वराडे, निखिलेश बुटले आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय दर्डा, उपाध्यक्ष अरुण पोबारू, सचिव कीर्ती गांधी व सदस्य किशोर दर्डा, डॉ सुधा राठी, देवकिशन शर्मा, ॲड महेंद्र ओसवाल, शाळेच्या प्राचार्या मिनी थॉमस यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.