
अशा क्रीडा स्पर्धा नियमित व्हाव्यात – अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर ः मास्टर्स ॲक्वेटिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स ॲक्वेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ जलतरण तलावावर २६व्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेला शानदार सुरुवात झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक उर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मास्टर्स ॲक्वेटिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष राजेश मेहता, उपाध्यक्ष उल्हास पटेल, सचिव मुकेश बाशा, ॲड मिरा बाशा तसेच महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स ॲक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, सचिव शेखर भावसार, मास्टर्स फेडरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापू किनगावकर, फाऊंडर अध्यक्ष डॉ अरविंद शिरभाते, सतीश दवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३९७ महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश भोसले, राहुल डहाळे, अमोल झाल्टे, डॉ सुनील देशमुख, देविदास झिटे, संजू सराफ, नागार्जुन अकोला आदींनी परिश्रम घेतले आहेत.