
छत्रपती संभाजीनगर ः आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने मुले व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. या फुटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत मुले व मुली या दोन्ही फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे देवगिरी महाविद्यालयाचे दोन्ही संघ परभणी येथे होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांच्या संघाने दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. या विजयी संघात आयुष राहुल पांडे, ऋग्वेद मुकुंद जोशी, प्रतिकेश शिंदे, कृष्णा शिवाजी ठोंबरे, शेख सुफियान, कुणाल आनंद नरवडे, वरद आशिष शर्मा, अबूबकर असलम पटेल, शेख अलीम शेख अनिस, शेख मुदस्सीर, पार्थ देवेंद्र क्षीरसागर, ओम रवींद्र पंडितकर, ओमकार परदेशी, अबेदी मोहम्मद, गौरव शिरीष देवळे, रोहन सुनील कुमार ओझा, प्रतीक रविशंकर अंगडी व साकिब बाबा शहा यांचा समावेश आहे.
मुलींच्या संघाने देखील अप्रतिम खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. विजयी मुलींच्या संघात आर्या कुमारी, आर्या श्रीपाद कुलकर्णी, सिद्धी कमलेश मुनोत, सायली विलास जाधव, सांडसे ईश्वरी दयानंद, निशा दिनेश भिसे, जानवी सुनील राऊत, आरुषी अशोक बनकर, सोनिका चकमा, शकुंतला सुदाम राजगुरू, नेमाने कावेरी नवनाथ, सृष्टी आत्माराम शिंदे, रेश्मा शांताराम चव्हाण, हर्षदा रवींद्र बताडे, वंशिका अनिल अंभोरे व स्नेहा संतोष लोंढे या खेळाडूंचा सहभाग होता.
या विजयानंतर खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख राकेश खैरनार यांच्यासह कृष्णा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा मंगल शिंदे, प्रा अमोल पगारे, प्रा शुभम गवळी, शेख शफीक यांचे सहकार्य लाभले आहे.
या दुहेरी यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य रवी पाटील, उपप्राचार्य, प्रा अपर्णा तावरे, उपप्राचार्य, प्रा गणेश मोहीते, उपप्राचार्य अरुण काटे, उपप्राचार्य सुरेश लिपाने, उपप्राचार्य विजय नलावडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.