
छत्रपती संभाजीनगर ः जेईएस जालना येथे रविवारी पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन धनुर्विद्या स्पर्धेत पीईएस कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनची बीपीएड द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी मृण्मयी शिंदकर हिने तृतीय स्थान पटकावले.
मृण्मयी शिंदकर हिने रिकर्व राऊंड ७० मीटर या धनुर्विद्या प्रकारात १५५ आणि १३५ पॉइंट घेत तृतीय स्थान पटकावले. या कामगिरीमुळे तिने विद्यापीठाच्या संघात स्थान निश्चित करून आपल्या कॉलेजचे नाव उज्वल केले.
तिच्या या घवघवीत यशाबद्दल प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी, प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, जी श्रीकांत, प्रा मजहर सय्यद, डॉ गौतम गायकवाड, प्रा संतोष कांबळे, प्रा श्यामला यादव, डॉ संदीप जाधव आदींनी तिचे अभिनंदन आणि कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.