
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा
नाशिक ः भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व मधुरा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी १७ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा (उत्तर प्रदेश) येथे होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ हे संघ सहभाग होत आहेत. महाराष्ट्रातील तिन्ही संघ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत आहेत.
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कर्णधार हर्षद डवले, धीरज ठाकरे, विघ्नेश मढवी, सिद्धेश पारखे, अजित विश्वकर्मा, संगम राजभर, संदेश इंगळे, प्रेम कदम, आयुष खरात, सिद्धेश गोलांबडे ,गैरिज माळी या खेळाडूंचा समावेश आहे.
मुंबई संघात सुबोध मायनाक, आदित्य पवार, मयुरेश लाड, राजस चव्हाण, ओम संकपाळ, वरद माने, तुषार लोंढे, रोनित पवार, अर्णव पांचाळ, आरूष पिंपळे या खेळाडूंचा समावेश आहे.
विदर्भ संघात कर्णधार वेदांत पडोळ, सर्वेश झुटे, विक्रम दोंदले, अजय सुतार, तुषार करडे, अर्जुन कदम, गितराज कुंभार, हर्षल सानप, सम्राट तोरवे, आदित्य गोडकर यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल टेनिस क्रिकेटचे फाउंडर कन्हैया गुजर, महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील ठोंबरे, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव कुणाल हळदणकर, दर्शन थोरात यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र संघाचे र्गदर्शक म्हणून कुणाल हळदणकर, धनश्री गिरी, विजय उंबरे, लखन देशमुख, सोमा बिरादार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.